IND vs AUS 2nd Test Rohit Sharma Batting Order | (Harbhajan Singh) रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा नियमित कर्णधार आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला सामना तो खेळू शकला नाही. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतीय कर्णधार ऑस्ट्रेलियाला येऊ शकला नाही. रोहितच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान सांभाळली. आता भारतीय कर्णधार परतला आहे, परंतु त्याच्या फलंदाजीच्या क्रमात समस्या असल्याचे दिसत आहे, ज्यावर हरभजन सिंगने प्रतिक्रिया दिली.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने पर्थ कसोटीत यशस्वी जैस्वालसोबत सलामीची जबाबदारी स्वीकारली. राहुलने ओपनिंगमध्ये चांगली फलंदाजी केली होती, त्यानंतर त्याला ओपनिंगमधून काढून टाकणे योग्य होणार नाही असे बोलले जात आहे. पण मग अडचण अशी आहे की जर राहुल जैस्वालसोबत सलामीला आला तर रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर खेळेल ? रोहित शर्मासोबत शुभमन गिलही दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल. गिल तिसऱ्या क्रमांकावर आपली जागा घेऊ शकतो. अशा परिस्थितीत केएल राहुलच्या जागी रोहित शर्मा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर येईल का? असा सवाल उपस्थित होतोय.
यावर पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला, “मला रोहित शर्मा पाच किंवा सहाव्या क्रमांकावर येताना दिसत नाही. एकतर रोहित शर्मा सलामीला यशस्वी जैस्वालसोबत येतो आणि केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर येतो किंवा तो तीनच्या खाली फलंदाजी करणार नाही. रोहित शर्माने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणे चांगले नाही.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शपथविधीपूर्वी सागर बंगल्यावर हालचालींना वेग, शरद पवारांच्या खासदाराची फडणविसांशी भेट
भाजपकडे गृहमंत्रीपद मागणार का? एकनाथ शिंदे यांनी सांगितली मनातली गोष्ट | Eknath Shinde