मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची आठवलेंनी केली राज्यसभेत मागणी

मुंबई : भारतीय संविधानाचे (Indian Constitution) शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे (Babasaheb Ambedkar) नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस (MSRT) ला देण्यात यावे या आंबेडकरी जनतेच्या मागणीचा पुनरुच्चार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwle) यांनी राज्यसभेत केला.

महाराष्ट्राला रेल्वे खात्याचे राज्यमंत्री पद लाभले आहे. मात्र महाराष्ट्राच्या रेल्वे बाबत च्या समस्या सोडविण्यासाठी भरीव निधी देण्यात यावा. मुंबईत नवीन 2 लोकल रेल्वे चे ट्रॅक सुरू करावेत.नवीन रेल्वे मार्ग सुरू कराव्यात अशा अनेक मागण्या संसदेत रामदास आठवले यांनी केल्या. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे काम चांगले असल्याचे कौतुक ही ना.रामदास आठवले यांनी केले.

केंद्रीय कामगार मंत्री म्हणून भुपेंद्र यादव यांचे काम चांगले आहे. मात्र देशात सफाई कामगारांच्या अडचणी सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.सफाईचे काम नियमित आणि नित्याची गरज असते.त्यामुळे सफाई काम कंत्राटी कामगारांकडून करून घेणे योग्य नाही. सफाई कामगारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती न देता कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. सफाई कामगार अनेक वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करतात मात्र त्यांना कायस्वरूपी नियुक्ती मिळत नाही. त्यामुळे सफाईकामगारांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय केंद्र सरकार ने घेऊन सर्व राज्यांना आणि स्थानीय स्वराज्य संस्थांना बंधनकारक करावा अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी राज्यसभेत केली.