‘दोन कवडीचा दावा करता येत नाही म्हणून सोमय्यांच्या विरोधात एक रुपयाचा दावा दाखल करणार’

kirit somayya

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात आता त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल करणार असून दोन कवडीचा दावा दाखल करता येत नाही म्हणून १ रुपयाचा दावा दाखल करणार आहे.

सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची असंबंध बडबड सुरु असते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दिडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे तेवढ्याच किमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करणार आहे असेही लोंढे म्हणाले.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=G4H1kdtPdh0

Previous Post
shankarrao gadakh

‘तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या शंकरराव गडाखांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा’

Next Post

ऑटोरिक्षासाठी लवकरच नवीन मालिका, आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts
विराट-अनुष्काच्या मुलाने एक वर्षाचा होण्यापूर्वीच नावावर केला विक्रम, वाचा सविस्तर

विराट-अनुष्काच्या मुलाने एक वर्षाचा होण्यापूर्वीच नावावर केला विक्रम, वाचा सविस्तर

Akay Kohli | या वर्षी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली त्यांच्या दुसऱ्या अपत्यामुळे…
Read More

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा; नवीन कार्यकारिणीमध्ये १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीसांचा समावेश

Mumbai – भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बुधवारी पत्रकार…
Read More
झोलझाल

हास्याचा धुमाकूळ घालत झोलझाल सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

पुणे – दोन वर्ष अंधारात काढलेल्या कोरोनाच्या (Corona) काळ्याकुट्ट काळानंतर सर्वच क्षेत्रांनी जोर धरला आहे. चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या मनावर…
Read More