हिंदू देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप; काँग्रेस नेत्या व्ही शैलजा यांच्या घरावर हल्ला

दक्षिण कन्नड – कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथे, सोशल मीडियावर हिंदू देवतांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी (Offensive remarks on Hindu deities) केल्याबद्दल काँग्रेस आयटी सेलच्या सचिव व्ही शैलजा अमरनाथ (V Shailja Amarnath) यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. पोलिसांनी ही माहिती दिली. हिंदू संघटनांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शैलजा यांच्यावर धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याच्या आणि शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी शैलजा यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांनी खिडकीच्या काचा फोडल्या आणि भिंतींवर काळी शाई फवारली. याप्रकरणी शैलजा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शैलजा यांच्या घरी पोहोचून पाहणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्ल्याचा तपास अजूनही सुरू आहे.

दरम्यान,विश्व हिंदू परिषद (VHP)आणि बजरंग दल (Bajrang Dal) सारख्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी 16 जून रोजी आयोजित कार्यक्रमात क्लब हाऊसच्या मंचावरून भगवान राम, हनुमान आणि देवी सीता (Lord Rama, Hanuman and Devi Sita) यांच्याबद्दल सेलजा यांच्या कथित अपमानास्पद टिप्पणीचा तीव्र निषेध केला.