Raj Thackeray | पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांना शिवसेनेत आणण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. काही जिल्हाध्यक्षांना थेट फोन करून शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली होती, तर काहींना महामंडळ पदांचे आमिष दाखवले गेले होते.
या संदर्भात शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर एक बैठकही पार पडली होती. हा संपूर्ण प्रकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली.
राज ठाकरे यांची स्पष्ट भूमिका:
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेत स्पष्ट शब्दांत सांगितले, “आत्ता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये, पुढचा निर्णय तुमचा आहे.” मात्र, सर्व जिल्हाध्यक्षांनी मनसेतच राहण्याचा निर्णय घेतला आणि कोणताही राजकीय गोंधळ न करता संघटनेत एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज ठाकरेंनी उदय सामंतांना विचारला जाब
या घडामोडीनंतर राज ठाकरे यांनी आज स्वतः उदय सामंत यांना भेटीस बोलावले आणि मनसे फोडण्याचा प्रयत्न सोडण्याचा स्पष्ट इशारा दिला. “मिशन टायगरमध्ये मनसे फोडण्याचा विचार सोडा,” अशा शब्दांत त्यांनी सामंत यांना सुनावल्याची माहिती मिळाली आहे.
या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मनसे-शिवसेनेतील संबंध आणि पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल
‘हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा’, बॉलीवूड गायकाचं थेट योगींना आव्हान
गजा मारणेच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण; मुरलीधर मोहोळ यांचा संताप