भाजपकडून 10 कोटींहून अधिक किंमतीत आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न; अशोक गेहलोत यांचा दावा

जयपूर – मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. भाजप आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेहलोत म्हणाले की, भाजपने काँग्रेसच्या आमदाराला 10 कोटींहून अधिक किंमतीत विकत घेण्याचा प्रयत्न केला होता.

गेहलोत म्हणाले की, भाजपला सरकार पाडायचे आहे. मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, मी 102 आमदारांना विसरू शकत नाही. या 102 आमदारांनी मिळून सरकारला वाचवले आहे. हे सांगताना सीएम गेहलोत यांनी भाजपवर हॉर्स ट्रेडिंगचा आरोप केला आहे

ते म्हणाले की, राजस्थानमध्ये निवडणूक जिंकणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. ते पुढे म्हणाले की,केंद्र सरकारला वारंवार वेठीस धरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.