Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; डिझायनरविरोधात गुन्हा दाखल

Mumbai – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या तक्रारीनुसार एका डिझायनरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला. अमृता फडणवीस यांना अनिष्का नावाच्या महिलेनं अप्रत्यक्षरित्या धमकावून, कट रचून 1 कोटींची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला होता.

मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीसांनी २० फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडीलांविरोधात कलम १२०, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एफआयआरमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्षाने तिच्या व्हिडीओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक संदेश एका अज्ञात फोन नंबरवरुन त्यांना पाठवले. तिच्या वडिलांसोबत, ती महिला अप्रत्यक्षपणे अमृता यांना धमकी देत होती. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षडयंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.