‘खंडणी सरकारच्या गेल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीतचे फलित म्हणजे सुपारीचे खांड’

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या कृतीमुळे चर्चेत राहतात टर कधी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चर्चेत राहतात. आता डोकं शांत ठेवण्यासाठी पानमसाला खा असा सल्ला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिला आहे.

मुस्लिमांना डोकं शांत ठेवा असा सल्ला देताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांनी पानसुपारी,रजनीगंधा, पानमसाला खा असं सांगितलं. भिवंडी शहरातील जकात नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जितेंद्र आव्हाड यांच्या या अजब वक्तव्यावर आता राजकारण रंगायला सुरवात झाली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या खरपूस समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लिम बांधवांना डोकं शांत ठेवण्यासाठी पानसुपारी, पानमसाला खाण्याचा अजब सल्ला दिला आहे. खंडणी सरकारच्या गेल्या दोन वर्षांच्या कारकीर्दीतचे फलित म्हणजे सुपारीचे खांड. आणि तेही फक्त मुस्लिम बांधवां करता.’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.

हे देखील पहा