‘राहुलजी स्क्रिप्ट शिवाय दोन शब्द बोलू शकत नाहीत, स्क्रिप्ट दिल्यानंतरही जे बोलतात ते विनोदीच असतं’
मुंबई – नेपाळ मधील एका व्हिडीओमुळे कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) चर्चेत अआले असताना आता भाजपकडून (BJP) आणखी एक व्हिडीओ व्हायरल (Video viral) करण्यात आला आहे. भाजपा नेते अमित मालवीय (BJP leader Amit Malviya) यांनी राहुल गांधींचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
हा व्हिडीओ तेलंगणात शेतकरी रॅली (Farmers Rally) सुरू होण्याआधीचा आहे. यामध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान आजचा विषय काय ? मला काय बोलायच आहे ? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून (Twitter account) हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, आता याच व्हिडीओवरून भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राहुल गांधी यांना टोमणा मारला आहे. राहुलजी स्क्रिप्ट (Script) शिवाय दोन शब्द बोलू शकत नाहीत. अर्थात स्क्रिप्ट दिल्यानंतरही जे बोलतात ते विनोदीच असतं…असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
राहुलजी स्क्रिप्ट शिवाय दोन शब्द बोलू शकत नाहीत. अर्थात स्क्रिप्ट दिल्यानंतरही जे बोलतात ते विनोदीच असतं… pic.twitter.com/28lrGsEa8b
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 7, 2022