‘संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमाणेच भाजपने राज ठाकरे यांचाही वापर करून घेतला आणि आता सोडून दिले’

मुंबई – सर्वपक्षांनी मिळून मला राज्यसभेवर निवडून द्यावं, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी  (Sambhaji Raje Chhatrapati) केले होते. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या (संभाजीराजे छत्रपतींनी) चिन्हावर निवडणूक (Election) लढवावी, अशी ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला. त्यांच्याकडून कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Kolhapur Shiv Sena district chief Sanjay Pawar) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्याने मराठा संघटना (Maratha organization) आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुढील काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) , राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या घरावर चाल करुन जाणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट केले आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक, विश्वासघात केला म्हणूनच संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपची साथ सोडली …. संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमाणेच भाजपने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचाही वापर करून घेतला आणि आता सोडून दिले… ‘गरज सरो वैद्य मरो’ हीच फडणवीस निती आहे. असं लोंढे यांनी म्हटले आहे.