गुरुपौर्णिमा गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ! २० तासांत केला २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूजचा टप्पा पार !

पुणे – एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सफल झालं याचं परिमाण सांगताना आपण नेहमी ‘मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे’ या उक्तीचा वापर करतो. आपण हयात नसतानाही कीर्तीरूपांत लोकांच्या स्मरणात राहणे, त्यांच्या आठवणीत जिवंत राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते. असं जगणं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं.

अशा जगण्याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) ही गुरू शिष्याची जोडी. आपल्या हयातीत या दोघांना लोकांचं जेवढं प्रेम मिळालं तेवढंच प्रेम त्यांच्या इहलोकी गेल्यानंतरही कायम आहे. या प्रेमाची प्रचिती आपल्याला वारंवार येतच असते. याहीवेळी ती आली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलं आहे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkampost Thane) हा चित्रपट. ठाण्याचा ढाण्या वाघ असलेले जननायक धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे.

या चित्रपटाचा टिझर समाजमाध्यमांवर (Movie Teaser Viral On Social Media) सत्तर लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला. नुकतंच या चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ (Gurupaurnima Song) हे गाणं समाजमाध्यमावर प्रदर्शित झालं आणि केवळ २० तासांमध्ये या गाण्याला २० लाखांहून अधिक प्रेक्षकवर्ग लाभला असून हजारो लोकांनी हे गाणं आपापल्या पेजवरून शेअरही केलं आहे. युट्यूबवर सुद्धा हे गाणे नंबर १ ला ट्रेडिंगमध्ये आहे हे विशेष.

धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी गुरू, मार्गदर्शक, तत्त्वेता एवढंच नाही तर त्यांच्या गाभाऱ्यातील देवाच्या स्थानी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे दिघे यांच्यासाठी अखेरचा शब्द. अशा या गुरुची पाद्यपूजा करत या नात्याला सन्मान देणारा प्रसंग गुरुपौर्णिमा या गाण्यातून रेखाटण्यात आलाय. हे गाणं काल प्रदर्शित झालं आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर यांच्यातील नात्याचा हा अनोखा प्रसंग बघताना अनेकजण भावूक झाले.

जसं हे गुरू शिष्याचं नातं सर्वश्रुत आहे तसाच निर्मळ आणि निरपेक्ष भाव आहे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या गुरू-शिष्याच्या नात्यात. याही नात्याची एक झलक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला मिळाली. या गाण्यामुळे आता चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. येत्या १३ मेला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Previous Post

कौतुकास्पद : सुट्टी असणाऱ्या अग्निशमन जवानाने विझवली घराला लागलेली आग; धोका टळला

Next Post

एलोन मस्कला ट्विटर विकत घेण्यासाठी पैसे कुठून आणणार ? तपशील जाणून घ्या

Related Posts
एकनाथ शिंदे हे फडणवीसांनी दिलेली स्क्रिप्ट वाचणारा बोलका पोपट - अतुल लोंढे

एकनाथ शिंदे हे फडणवीसांनी दिलेली स्क्रिप्ट वाचणारा बोलका पोपट – अतुल लोंढे

मुंबई – राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकर यांचा अपमान केला असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी…
Read More
Yuvraj Singh च्या घरातून 75 हजार रुपयांचे दागिने गेले चोरीला, आई शबनम यांनी नोकरांवर लगावला चोरीचा आरोप

Yuvraj Singh च्या घरातून 75 हजार रुपयांचे दागिने गेले चोरीला, आई शबनम यांनी नोकरांवर लगावला चोरीचा आरोप

Yuvraj Singh: माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या पंचकुला येथील एमडीसी सेक्टर 4 येथील घरातून रोख रक्कम…
Read More
Nitesh Rane | अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर खुल्या चर्चेला या; नितेश राणेंचे उबाठा, राऊत यांना आव्हान

Nitesh Rane | अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर खुल्या चर्चेला या; नितेश राणेंचे उबाठा, राऊत यांना आव्हान

Nitesh Rane | केंद्रातील एनडीए सरकारच्या विकसित भारताची पायाभरणी करणा-या अर्थसंकल्पाचे देशाच्या कानाकोप-यातून कौतुक होत असताना अर्थसंकल्पाबाबत काहीही…
Read More