मामी गप्प बसा! अमृता फडणवीस-मनीषा कायंदे यांच्यात ट्वीटरवर जुंपली

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत. या वादात फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली होती. याला आता शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी उत्तर दिले आहे.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद होताच अमृता फडणवीसांनी ट्विट करीत निशाणा साधला. आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है, असे ट्विट त्यांनी केले. त्यांचा रोख राऊतांवर होता. याला लगेचच शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी अमृता फडणवीसांचे नाव न घेता म्हटले आहे की, शेर की दहाड से डरी हूई बिल्लीया आवाज निकालाने की कोशीष कर रही है। मामी गप्प बसा! असं म्हटलं आहे.