आयुष बडोनीचा अफलातून षटकार, महिलेचं डोकं फुटलं ? पाहा VIDEO

मुंबई – आयपीएल 2022 सुरू झाले आहे, परंतु चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हंगामाची सुरुवात चांगली झालेली नाही. महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni)कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि रवींद्र जडेजाला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले. ( Chennai Super Kings ) जडेजाच्या नेतृत्वाखाली, CSK प्रथम कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभूत झाले (Batsman Robin Uthappa ) आणि आता गुरुवारी (दि. 31 मार्च)रोजी त्यांना लखनऊ सुपर जायंट्सकडून पराभवाचा सामना करावा लागला.

लखनौविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 211 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. लखनौने हे लक्ष्य 19.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. रॉबिन उथप्पाच्या 50 आणि शिवम दुबेच्या 49 धावांच्या जोरावर संघाला ही धावसंख्या गाठण्यात यश आले. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाने 3 चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. यादरम्यान एविन लुईसने 23 चेंडूत 55 धावांची तुफानी खेळी केली. लुईस सोबत आयुष बडोनी या नवोदित खेळाडूने देखील कमाल केल्याचं दिसून आलं. लखनौसाठी एविन लुईस 23 चेंडूत 55 धावा करून नाबाद राहिला, तर आयुष बडोनीने 9 चेंडूत 19 धावा केल्या.

दरम्यान, सामन्यात लखनौ संघाला 12 चेंडूत 34 धावांची गरज होती आणि त्यांच्या 6 विकेट्स शिल्लक होत्या. चेन्नई संघाचा कर्णधार रवींद्र जडेजाने मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेला 19 वे षटक दिले. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर क्रीझवर असलेल्या आयुष बडोनीने स्वीप शॉट खेळताना डीप स्क्वेअर लेगवर लांब आणि उत्तुंग षटकार लगावला.

हा चेंडू थेट स्टँड्समध्ये जाऊन एका महिला प्रेक्षकाच्या डोक्याला लागला. चेंडू आदळल्यानंतर त्या महिलेने डोकं पडकलं होतं, मात्र ती टीव्ही स्क्रीनवर दिसतेय हे कळल्यावर तिने स्माईल केलं. त्यावेळी समालोचक सांगत होते की, महिलेला फारशी दुखापत झाली नसावी, अशी आशा आहे. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

https://twitter.com/time__square/status/1509590551145811978?s=20&t=fo11AFRpuPhko2H2Vh582w