‘या’ चित्रपटाने पटकावला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार

'या'  चित्रपटाने पटकावला सर्वोत्तम मराठी  चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली :  67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार आज उपराष्ट्रपती वैकंया नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता हा पुरस्कार ताजमाल या चित्रपटास प्रदान करण्यात आला. यासह सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत आनंदी गोपाळ या मराठी सिनेमाला प्रदान करण्यात आला.  विज्ञान भवनात 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  आज दिले गेलेले पुरस्कार वर्ष 2019 चे आहेत.

अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

सुप्रसिद्ध तसेच बहुभाषीक अभिनेता रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रजनीकांत ला  रजिनी, थलैवा, सुप्परस्टार, बॉस असेही संबोधले जाते. त्यांनी कन्नड, तेलगु, तमिळ, हिंदी, मल्ल्याळम, इंग्लिश, बंगाली या भाषेतील सिनेमांमध्ये अभिनय केलेला आहे. त्यांच्या विश‍िष्ट स्टाईलमुळे, डायलॉग डीलीवरीमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग भारतभर आहे.    आशिया खंडातील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. रजीकांत यांचे मुळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड असुन ते कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील मराठी कुटूंबातील आहेत. त्यांची चित्रपट सृष्टीतील कारर्कीद 1975पासून सुरू केली.

अभिनेता मनोज वाजपेयी यांना ‘भोसले’ या हिंदी चित्रपटासाठी तर दक्षिण भारतीय अभिनेता धनुष्य यांना ‘असुरन’ यांना तमिळ चित्रपटासाठी  दोन्ही अभिनेत्यांना  यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील पुरस्कार विभागुन प्रदान करण्यात आला.  अभिनेत्री कंगना रणावत यांना ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘बार्डो’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे हे आहेत. रितु फिल्मस कट एलएलपीने हा चित्रपट निर्माण केलेला आहे. याच चित्रपटातील  ‘रान पेटला…’ या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिसाइनचाही पुरस्कार मिळाला आहे.  प्रोडक्शन डिसाइन सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे. राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला प्रदान करण्यात आला आहे.  हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शीत केला आहे. तर टूलाईन स्टूडियो प्रा.ली. यांची निर्मिती आहे.

‘ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘सुपर डिलक्स’ या तमिळ सिनेमासाठी विजय सेथुपथी यांना सहायक अभिनेता या श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार

‘जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रियेशन ने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.

उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहे.  राज प्रितम मोरे हे या स‍िनेमाचे दिग्दर्शक आहे. सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत  ‘होली राईट्स’ या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.

स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार प्रदान

स्पेशल मेन्शन या श्रेणीत सत्य घटनावर आधारित ‘लता भगवान करे’ या मराठी  सिनेमात अभिनय करणा-या लता करे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्रीमती करे यांचे पती आजारी होते त्यांच्या आजारपणासाठी लागनारा निधी गोळा करण्यासाठी त्या बारामतीतील  म्यारॉथनमध्ये धावुन प्रथम पुरस्कार मिळवणा-या लता करे या आहेत. त्यांच्या या विलक्षण कृतीवरच हा सिनेमा बनविलेला आहे.

याच श्रेणीत ‘पिकासो’ या मराठी सिनेमाला सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत. ‘त्रिज्या’ या सिनेमाला उत्कृष्ट ऑडीयोग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. चित्रपटांवरील उत्कृष्ट समिक्षात्मक पुस्तक या श्रेणीत ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला  स्पेशल मेन्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हे पुस्तक अशोक राणे यांनी लिहीले आहे.

Previous Post
२००७ साली भारताला पहिला  T20 विश्वचषक जिंकून देणारे महारथी सध्या काय करत आहेत?

२००७ साली भारताला पहिला  T20 विश्वचषक जिंकून देणारे महारथी सध्या काय करत आहेत?

Next Post
शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

गारपीठीने शेतकरी आडवा झालाय आणि पंचनामे करायला कोण नाही – अजित पवार

मुंबई – सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ…
Read More
भावाच्या अपघातानंतर वडिलांना दिलेले वचन, अवघ्या दोन दिवसांतच सरफराज खानने केले पूर्ण | Sarfaraz Khan

भावाच्या अपघातानंतर वडिलांना दिलेले वचन, अवघ्या दोन दिवसांतच सरफराज खानने केले पूर्ण | Sarfaraz Khan

इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना भारतीय संघाचा फलंदाज सर्फराज खानने  (Sarfaraz Khan)शेष भारताविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले. यासह सरफराजने…
Read More
अर्थसंकल्पातील घोषणांवरून धनंजय मुंडे यांची तुफान फटकेबाजी;तुकोबांचे अभंग ते शायरीतून काढले चिमटे

अर्थसंकल्पातील घोषणांवरून धनंजय मुंडे यांची तुफान फटकेबाजी;तुकोबांचे अभंग ते शायरीतून काढले चिमटे

मुंबई  – राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारला स्वतःच केलेल्या घोषणांचा विसर पडला आहे. विसराळू सरकारने मागील काही निवडणुकांमध्ये मिळालेले…
Read More