माढ्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीवर बबनराव शिंदे गटाची सत्ता कायम

सोलापूर  – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे.  दरम्यान, या लढाईत भाजप आणि शिंदे गटाची सरशी होताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान,  ग्रामपंचायत निवडणूक निकालात (Gram Panchayat Election Result) सोलापुरात महाविकास आघाडी पुढे दिसत आहे. माढ्यात बबनराव शिंदेंचा गट पुढे आहे. माढा तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) गटाची सत्ता कायम आहे. तर पडसाळीत घडले 20 वर्षानंतर परिवर्तन झालंय. समविचारी नेत्यांकडे गावची सत्ता आलीय.

माढा तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतवर आमदार बबनराव शिंदे समर्थक तथा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ यांच्या गटाकडे सत्ता कायम राहिली आहे. तर पडसाळी ग्रामपंचायत वर चार टर्म सत्तेत असलेला प्रताप पाटील गटाचा पराभव झालाय. या ठीकाणी एकत्रित आलेल्या समविचारी दत्ता फरड आणि सचिन पाटील गटाकडे गावची सत्ता गेलीय.