IND vs PAK: बाबर आझमच्या नावावर जमा झाला ‘हा’ लज्जास्पद विक्रम

IND vs PAK:  भारताविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात पाकिस्तानला त्याचा स्टार कर्णधार बाबर आझमकडून खूप आशा होत्या. पण भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर त्याच्या आशांवर पाणी फेरले. रविवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात बाबरला खातेही उघडता आले नाही.  अर्शदीपने चाची विकेट काढली.

टी20 विश्वचषक 2021 मध्ये भारताविरुद्ध 52 चेंडूत 68 धावा करून नाबाद राहिलेल्या बाबरला यावेळी सावरण्याची संधी मिळाली नाही. वर्षभरापूर्वी बाबरने बरीच प्रशंसा मिळवली होती, यावेळी त्याच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला. बाबरने पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली. बाबर आता T20 विश्वचषकात गोल्डन डकवर (पहिल्या चेंडूवर बाद) बाद होणारा पाकिस्तानचा दुसरा कर्णधार बनला आहे. त्याच्या आधी शाहिद आफ्रिदी 2010 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता धावबाद झाला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या ७७ धावांवर तीन विकेट पडल्यानंतर शाहिद आफ्रिदी फलंदाजीला आला. पण त्याने पहिल्याच चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो धावबाद झाला.

आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला गट सामन्यात इंग्लंडकडून ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी बाबरच्या नेतृत्वाखालीही असेच काहीसे घडले. सुपर 12 टप्प्यातील गट सामन्यातही पाकिस्तानला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला.

भारताने हा सामना चार गडी राखून जिंकला

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यानंतर पाकिस्तानचा निम्मा संघ 100 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, शान मसूद आणि इफ्तिखार अहमद यांनी अर्धशतके झळकावत संघाची धावसंख्या १५९ पर्यंत नेली. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी 3 बळी घेतले. पाकिस्तानच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली कारण त्यांनी 31 धावांत चार विकेट गमावल्या. मात्र विराट कोहली (82*) आणि हार्दिक पांड्या (40) यांनी मिळून संघाला विजय मिळवून दिला.