कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी वाईट बातमी, ‘हा’ गेमचेंजर खेळाडू जखमी झाला

India vs Australia 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अहमदाबादच्या मैदानावर खेळली जात आहे. टीम इंडियाने मालिकेत आधीच 2-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे, पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला तिसरा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने आतापर्यंत चार विकेट गमावून 333 धावा केल्या आहेत, मात्र यादरम्यान टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू जखमी झाला आहे.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या जागी पाचव्या क्रमांकावर रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर चौथ्या दिवशी 28 धावा करून जडेजा बाद झाला तेव्हा अय्यर फलंदाजीला आला नाही आणि केएस भरतला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. आता श्रेयसला पाठदुखी असल्याच्या बातम्या येत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, श्रेयस अय्यरने पाठीच्या खालच्या भागात दुखत असल्याची तक्रार केली असून त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले असून तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर आहे आणि तो या सामन्यात फलंदाजीसाठी उतरेल की नाही हे सध्या तरी कळू शकलेले नाही. दुखापतीमुळे अय्यर पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही. या सामन्यात तो फलंदाजीसाठी उतरला नाही तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल.