बड्डे आहे ‘खंडू’ भावाचा; जल्लोष साऱ्या गावाचा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) म्हणजे ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट (Oxford of the East) असं आपण म्हणतो.याच ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट मध्ये एक अनोखा वाढदिवस साजरा (Celebrate a birthday) करण्यात आला आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लाडका असलेला ‘खंडू’ नावाच्या श्वानाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा (Celebrate the birthday of a dog named ‘Khandu’ in a big way) करण्यात आला.

या वाढदिवसाठी तीन दिवसांपूर्वी मोठा फ्लेक्स लावण्यात आला होता. सोशल मीडियावरून त्याची जोरदार प्रसिद्धी देखील करण्यात आली होती. त्यानंतर मोठा केक कापून फटाके फोडून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यामुळे ‘खंडू’ ची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.

पुणे विद्यापीठात ‘खंडू’ चांगलाच प्रसिद्ध आहे.याआधी देखील त्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांपासून वाचवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या ‘खंडू’वर विशेष प्रेम आहे. पुणे विद्यापीठाचा ‘जिगरबाज’, ‘धाडसी’ आणि ‘कर्तव्यदक्ष’, अशी या खंडूची ओळख आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस सगळ्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा करण्याचं ठरवलं होतं. विद्यार्थ्याने असा अनोखा वाढदिवस साजरा केल्यामुळे विद्यापीठात देखील चांगलीच चर्चा रंगली. खंडूने अनेकदा विद्यार्थ्यांची मदत केली आहे. विद्यापीठाचा परिसर दाटीवाटीत असल्याने तिथे कायम साप आढळतात. अनेक विद्यार्थ्यांना संर्पदंशही झाला आहे. मात्र खंडू च्या सतर्कतेमुळे सर्पदंश याचा धोका कायम टळला आहे.

तहसीलदार अविनाश शेंबटवाड (Tehsildar Avinash Shembatwad) यांनी वसतीगृहात हा खंडू आणला होता. त्यानंतर त्यांचे मित्र विनोद वाघ (Vinod Wagh), योगेश सोनावणे आदींनी खंडूचा सांभाळ केला. गेले तीन वर्ष झाले हे सगळे खंडूचा वाढदिवस जल्लोषात साजरा करत आहेत.शेंबटवाड हे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात तहसिलदार आहेत. तर विनोद वाघ आणि योगेश सोनावणे हे विद्यापीठातचं वास्तव्याला आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे खंडू कडे विशेष लक्ष असतं.विनोद वाघ म्हणाले की एखाद्या दिवशी विद्यापीठात येऊन खंडूची भेट झाली नाही तर काहीतरी चुकल्यासारखं होतं.त्यामुळे माझा दिनक्रम कितीही व्यस्त असला तरी मी ‘खंडू’ची भेट आवर्जुन घेतो. तर योगेश सोनावणे म्हणाले की खंडू हा आमच्या विद्यापीठीय जीवनात महत्त्वाचा घटक होऊन गेला आहे. एका अर्थाने आमच्या मित्र परिवारातील तो एक घटक आहे. अशा या ‘खंडूचा सगळ्यांनाच लळा लागला आहे.