संजय राऊत यांच्या अटकेचा बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या ड्रायव्हरने पेढे वाटून केला आनंद व्यक्त

नवी दिल्ली- शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीने (ED) रविवारी अटक केली. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सोमवारी त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊत हे 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत.

संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या यांच्या ड्रायव्हरने पेढे वाटले आहेत. शिवसैनिक प्रकाश राजपूत यांनी हे पेढे वाटले आहेत. राजपूत हे धुळ्यामधून पेढे वाटण्यासाठी थेट दिल्लीला गेले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांनी भेट घेतली.

यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना संपवली असेही ते म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्या अटकेचा पेढे वाटून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.संजय राऊत जेलमध्ये गेले आहेत त्यामुळे मी पेढे वाटत आहे. त्यांनी खूप चुकीचे काम केले आहे. संजय राऊत यांनी शिवसेना संपवली आहे, असे प्रकाश राजपूत म्हणाले.