बाळासाहेब थोरात सध्या आमच्यासोबत बोलतच नाहीयेत; नाना पटोले यांचा मोठा खुलासा   

Balasaheb Thorat : कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीमाना दिल्याची माहिती समोर येत आहेत. बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole )  यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्यांंनी राजीमामा दिला असल्याची सध्या चर्चा आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांचा कोणताही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही. तसेच त्यांनी कोणतेही पत्र दिले नसून, दिले असेल तर मला दाखवा असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. सोबतच बाळासाहेब थोरात सध्या आमच्यासोबत बोलतच नसल्याचे नाना पटोले म्हणाले आहे.