‘भाजप सोबत पुन्हा महायुती चे सरकार आणणे हीच बाळासाहेबांना खरी अदारांजली ठरेल’

मुंबई – शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे सरकार स्थापन करावे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा ,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची आपण भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी प्रतिपादन केले.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती ची एकजूट उभी केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी ला हद्दपार करून भाजप, शिवसेना, आरपीआय, शिवशक्ती, भिम शक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.ते साकार करण्यासाठी
पुन्हा भजप शिवसेने ने एकत्र यावे असेही ते म्हणाले.

शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भजप ला 50 टक्के सत्तेतील सहभाग द्यावा या पर्यायावर भाजप आणि शिवसेना यांनी विचार करावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.