महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला तो बाळासाहेबांना सुद्धा आवडला असता – पवार

पुणे – पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आलं की महाविकास आघाडीचा(MVA) प्रयोग बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) आवडला असता का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावर शिवसेना आणि शरद पवार (sharad pawar) यांनी एकत्र येण्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांचीही भूमिका होती. असं त्यांनी म्हटलं आहे.

यानंतर शरद पवारांनी देखील संजय राऊत यांच्या सुरात सूर मिसळला. अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला तो बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) आवडला असता. तसेच जेव्हा राजकीय मतभेद होतात. त्या वेळेला बाळासाहेबांनी काय केलं असतं हे डोक्यात येतं आणि निर्माण झालेल्या वादावर उत्तर मिळतं असं शरद पवारांनी सांगितलं.