महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना नक्की आवडला असता – संजय राऊत 

पुणे – पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut)  यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आलं की महाविकास आघाडीचा(MVA)  प्रयोग बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) आवडला असता का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावर शिवसेना आणि शरद पवार (sharad pawar) यांनी एकत्र येण्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांचीही भूमिका होती. असं त्यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, मुळात बाळासाहेब असते तर त्यांची असं काही करायची हिंमत झाली नसती. बाळासाहेबांना ते चळाचळा कापायचे. मातोश्रीवर येण्याआधी दहावेळा विचार करायचे. आता परिस्थिती बदलली आहे असं नाही. पण आता शिवसेनेचे नेतृत्व टोकाचे सुसंस्कृत. पण आमच्यावर बाळासाहेबांचा प्रभाव आहे.

शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं, देशाचं नेतृत्त्व करावं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू, असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. देशात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद आणि क्षमता शरद पवार यांच्यात आहे. पण, मी पंतप्रधान पदाविषयी बोलत नाहीय, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि पंतप्रधानपदाचा विषय 2024 चा आहे.असं ते म्हणाले.