बाळासाहेबांकडून राजकारणात येण्याची ऑफर, लतादीदींचं असं उत्तर ऐकून बाळासाहेबांनी परत विषय काढला नाही

लता मंगेशकर आणि बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातील दोन मोठी प्रस्थ, दोघेही त्यांच्या क्षेत्रात नामांकित. शिवसेना बाळासाहेब ठाकरे लता दीदी यांना त्यांच्या भगिनी मानत. ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबाचा मोठा घरोबा देखील होता.हदयनाथ, लतादीदी,आशाताई,उषाताई,मीनाताई असे सर्वजण मंगेशकर बंधु- भगिनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बंगल्यावर जमत.

गोष्ट छोटी असो वा मोठी असू बाळासाहेब आवर्जून कौतुक करत असत.त्यावेळेस मंगेशकर बंधु-भगिनी यांनी बाळासाहेबांना एकत्रित असलेली श्रीराम- लक्ष्मण आणि सीता व हनुमान यांची सुंदर मूर्ती दिली होती.बाळासाहेबांना ती प्रचंड आवडली होती. बऱ्याचदा नातेसंबंधामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या स्वरूपात एकमेकांना आतून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत असते.

सुरुवातीच्या काही भेटीनंतर ज्यावेळेस कौटुंबिक सलोख्याचे संबंध नाते निर्माण झाले,त्यावेळेस एकदा बाळासाहेबांनी लतादीदी यांना राजकारणामध्ये येण्याचे निमंत्रण दिले,त्यावर लतादीदीनी असे उत्तर दिले की बाळासाहेबांनी पुन्हा कधीच राजकारणाचा विषय देखील काढला नाही.लता दीदी म्हणाल्या राजकारण माझा प्रांत नाही,आपण उत्तम राजकारणी आहात, चांगलं काम करत आहात माझ्या आपणास शुभेच्छा