सिंहगड रस्त्यावर सकाळी व सायंकाळी ट्रक व मोठ्या वाहनांना बंदी घाला; विश्वजीत देशपांडे यांची मागणी

पुणे : शहरातील सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते वडगाव पूल दरम्यान ओव्हर ब्रिज चे काम सुरु आहे सदर रस्ता अत्यंत रहदारीचा असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा हि नित्याची बाब झाली आहे त्यामुळे या रस्त्याने ये – जा करणाऱ्या चाकरमान्यांना रोज मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ यावेळेत सदर रस्त्यावर मोठ्या वाहनांना बंदी घालावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे  प्रदेश सरचिटणीस  विश्वजीत देशपांडे यांनी पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग यांना पत्र लिहून केली आहे.(Ban trucks and large vehicles on Sinhagad road in the morning and evening; Vishwajit Deshpande’s demand).

त्यासोबतच या रस्त्यावरची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी खालील उपाय योजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

१) राजाराम ब्रिज ते वडगाव ब्रिज दरम्यान सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ यावेळेत सदर रस्त्यावर मोठे ट्रक, बांधकाम साहित्याचे वाहतूक करणारी वाहन, सिमेंट मिक्सर ट्रक या सर्व मोठ्या वाहनांना बंदी करण्यात यावी.

२) सदर सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) रस्त्यावर वाहतूक पोलीस नियुक्त केलेले नाहीत काही ठिकाणी मार्शल आहेत परंतु त्यांचे कुणी एकत नाही परिणामी उलट्या दिशेने वाहन चालवणे सिग्नल जम्प करणे हे प्रकार वाढले आहेत यासंबंधी तात्काळ सर्व चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी.

३) सदर सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) रस्त्यावर संतोष हॉल चौक व ब्रह्मा हॉटेल चौक हे अत्यंत वर्दळीचे चौक आहेत व या चौकांना जोडणारे अंर्तगत रस्ते अत्यंत छोटे आहेत त्यामुळे संतोष हॉल चौक – विश्व मेडिकल – माणिकबाग – ब्रह्मा हॉटेल चौक असा वर्तुळाकार एकेरी रस्ता करावा.

४) सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) रस्त्यावर सर्व सिग्नलवरचे पादचाऱ्यांसाठीचे झेब्रा क्रॉसिंग चे पांढरे पट्टे पूर्णतः पुसले गेले आहेत गेल्या अनेकवर्षात हे पट्टे रंगवलेले नाहीत तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागतो आपण व महापालिकेच्या समन्वयाने सदर बाबीवर लक्ष देऊन झेब्रा क्रॉसिंग व्यवस्थित केल्यास नागरिकांना मोठी मदत होईल.

५) सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) रस्त्यावर तसेच आतले रस्ते म्हणजे सनसिटी रस्ता, गोयलगंगा रस्ता इत्यादी ठिकाणी अनधिकृत भाजी वाले / पथारी व्यावसायिक आपली दुकान व गाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत या लोकांचा तात्काळ बंदोबस्त करणे आवश्यक आहे.