पुणे : अंतराष्ट्रीय टी-ट्वेंटी विश्वकपमध्ये येत्या २४ तारखेला भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होत आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असताना भारतात मात्र हा सामना रद्द करण्यात यावा साठी इंटरनेटवर मोहीम उघडली आहे. ट्विटरवर #ban_pak_cricket हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
अशात पाकिस्तानकडून वारंवार भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करून सामान्यांचा, जवानांचा बळी जातोय. अशावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट सामना होणे योग्य नाही. अस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
तर, जय शहा आणि अन्य लोकांनाही चर्चा करून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असून, त्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणार आहे. अस देखील आठवले म्हणाले आहेत.
हे ही पहा:
https://www.youtube.com/watch?v=Su_ZPVhvInk