भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणाला (Bangladeshi person) मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी आरोपीला बनावट कागदपत्रांच्या आधारे दुबईला जात असताना विमानतळावर अटक केली.
मोहम्मद उस्मान करामत अली असे आरोपीचे नाव (Bangladeshi person)असून तो २०१२ पासून भारतात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने सांगितले की, तो बेकायदेशीरपणे भारतात आला होता, तो कोलकात्यात आला होता आणि त्यानंतर पुण्याला गेला होता, तिथे काम करत असताना त्याने त्याची कागदपत्रे बनवली होती.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप