बँकेची कामे घ्या उरकून,या आठवड्यात तब्बल आहेत इतक्या सुट्ट्या

तुमचे बँकेची काही कामे असतील तर आजच उरकून घ्या, कारण या आठवड्यात तब्बल चार दिवस बँका बंद राहणार आहेत.16 आणि 17 डिसेंबरला बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे.तसेच 18 व 19 डिसेंबरला शनिवार आणि रविवार अशा जोडून सुट्ट्या आल्या आहेत.त्यामुळे तब्बल 4 दिवस बँका बंद असणार आहेत.

सध्या केंद्र सरकारमार्फत  अनेक बँकांचे खाजगीकरण करण्यात येत आहे,याविरोधात युनायटेड फोरम ऑफ युनियनच्या वतीने दोन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. शनिवारी यूसोसो थाम यांची पुण्यतिथी असल्यामुळे शिलॉंगसह देशातील काही भागांमध्ये बँका बंद राहातील. शनिवारी बँका दुपारी दोन पर्यत चालू असतात. तसेच यूसोसो थाम यांच्या पुण्यतिथी निमित्य काही ठिकाणी सुट्ट्या आहेत.

बँका जरी बंद असल्या तरी ऑनलाइन बँकिंग हा पर्याय सुरू असणार आहे. निर्मला सीताराम यांनी घोषणा केल्याप्रमाणे देशातील दोन मोठ्या सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्यात येणार आहे.सरकारच्या या निर्णयाला बँक कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांनी विरोध केला आहे. कारण आपल्या देशातील 70 टक्के जनतेचा पैसा हा सरकारी बँकामध्ये आहे.जर बँकांचे खाजगीकरण झाले तर हा पैसा बूडू शकतो.त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.