एका जागरूक मतदाराने भाजपला लावले कामाला; पुणेरी पद्धतीने बॅनर्स लावून भाजपला घेरले 

Pune Bypoll Election: कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत.  कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, कसब्यात हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का? असा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत लागले आहेत. त्यामुळे भाजपविरोधातील वातावरण तापलं असल्याचं दिसून येत आहे.  पुण्यातील शनिवारवाड्या जवळ एका जागरूक मतदाराने हे बॅनर्स लावल्याने खळबळ उडाली आहे.