राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Baramati Assembly Elections) रणधुमाळी सुरू आहे. दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू शकते. त्यादृष्टीने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काही पक्षांनी हळूहळू त्यांचे उमेदवारही जाहीर करायला सुरुवात केली आहे. यादरम्यान लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
एकीकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून (Baramati Assembly Elections) स्वत: अजित पवार मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्जत-जामखेडमध्ये सध्या शरद पवार गटाचे रोहित पवार विद्यमान आमदार आहेत. तसेच बारामतीतून अजित पवार त्यांचे चिरंजीव जय पवार यांना उतरवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच जय पवार मैदानात उतरल्यास ही लढत आणखी रंजक बनेल. पुढारी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप