धायरी | सिंहगड रोड वाहतूक पोलीस (Sinhagad Road Traffic Police) विभागाला वाहतूक नियमनासाठी श्री वर्धमान मानव सेवा फाउंडेशनच्या वतीने १२ बॅरिकेड्स भेट देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते बॅरिकेड्स सुपुर्द करण्यात आले.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष भरत भुरट यांनी हा उपक्रम राबवला. या वेळी आमदार तापकीर यांनी वाहतूक नियमनासंदर्भात पोलिसांशी चर्चा केली. सामाजिक भान राखत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी (Sinhagad Road Traffic Police) भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील, असे भरत भुरट यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे, काळूराम मते, ज्योती भुरट, मनोहर बोधे, देवेंद्र चव्हाण, सुहास शहा आदी उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शिवस्मारक केवळ घोषणांपुरते! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान थांबवा! शरद पवार पक्षाची निदर्शने
तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद!, शिंदे यांचा रत्नागिरीतून उबाठावर हल्लाबोल
मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा! लांडगे यांची मागणी