आता तुळस देणार कमावून लाखों रुपये ,अवघ्या 15000 हजारात सुरू करा हा व्यवसाय

पूर्वी प्रत्येक घरासमोर तुळशीचे रोपे लावलेले असायचे. तुळशीला आयुर्वेदात फार महत्व आहे. तसेच तुळशीला धार्मिक आणि पारंपारिक महत्व देखील तितकेच आहे. पूर्वी आपण चालता- चालता तोंडात तुळशीची पाने घालत असू. तुळशीच्या पानामध्ये प्रतिकारशक्ती वाढविणारे अनेक गुणधर्म असतात. कोविड काळात म्हणजेच मागच्या वर्षीपासून तुळशीची मागणी खूप वाढली आहे. अनेक औषधे बनविण्यासाठी तुळस वापरतात.

आयुर्वेदिक औषधांत मोठ्या प्रमाणात तुळशीची पाने वापरली जातात. आता अनेकजन तुळशीची शेती देखील करतात. अगदी कमी गुंतवणूक करून तुम्ही भरघोस उत्पन्न मिळवू शकतात. तूळशीची शेती ही जुलै महिन्यांत केली जाते. तूळशीच्या झाडांना 45 बाय 45 सेमीच्या अंतराने लावायचे असते. तर आरआरओएलसी 12 व आरआरओएलसी 14 प्रजातीच्या रोपट्यांना 50 बाय 50 सेमी अंतराने लावावे. रोपट्यांना नियमित पाणी द्या.तुळशीचे पीक तीन महिन्यात येते.

तुळशीची तोडणी करण्याअगोदर किमान दहा दिवस पाणी देऊ नये. तुळशीच्या झाडांची पाने मोठी झाली की त्याची कापणी केली जाते. जेव्हा या झाडांना फुले येतात तेव्हा त्यातील तेलाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जेव्हा ही झाडे फुलू लागतात तेव्हा त्याची काढणी करावी. झाडांची ऊंची किमान 15 ते 20 मीटर असावी.आता तुम्ही विचार कराल की या पानाची तोडनी केल्यानंतर ही पाने विकायची कोणाला ?

तुम्ही ही पाने थेट बाजारात देखील विकू शकता किंवा अनेक आयुर्वेदिक औषध बनविणाऱ्या कंपन्या थेट बागा विकत घेतात. जसे की पतांजली इत्यादी. तूळशीमधून तुम्हाला तीन महिन्यांत किमान तीन लाख रुपये इतके उत्पन्न मिळू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे तुळशीच्या लागवडीसाठी आणि रोपांच्या खरेदीसाठी फक्त 25 हजार रुपये इतका खर्च येतो.