माजी क्रिकेटपटूंसाठी सचिव जय शाह यांचा मोठा निर्णय, BCCI ने 900 जणांच्या पेन्शनमध्ये वाढ केली आहे.

नवी दिल्ली- बीसीसीआयने (BCCI) माजी क्रिकेटपटू आणि माजी अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. माजी खेळाडूंच्या पेन्शनमध्ये वाढ (Increase in pensions of former players) करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah) यांनी केली आहे. यामध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटशी संबंधित 900 जणांचा समावेश करण्यात आला आहे. या लोकांना लवकरच या पेन्शनचा लाभ मिळू लागेल.

बीसीसीआय सचिवांनी ट्विट केले की,माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. सुमारे 900 लोकांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे 75 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के वाढीचा लाभ घेता येणार आहे.

विशेष म्हणजे, पेन्शन वाढवण्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) म्हणाले की, क्रिकेट बोर्डाने आमच्या माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणाले,आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे मंडळ म्हणून आमचे कर्तव्य आहे.त्यांची काळजी घेतली पाहिजे.

ते पुढे म्हणाले, आमच्या क्रिकेटपटूंचे कल्याण, मग ते भूतकाळ असो किंवा वर्तमान, सर्वोच्च प्राधान्य आहे आणि पेन्शनची रक्कम वाढवणे हे त्या दिशेने एक पाऊल आहे. बीसीसीआय पंचांच्या अनेक वर्षांच्या योगदानाची कदर करते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे.