सावध राहा रुपेश; वसंत मोरेंच्या मुलाला धमकी

पुणे : मागील काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. विविध उपक्रम आणि आंदोलनांमुळे वसंत मोरे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र, आता ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र (Threatening letter) मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत मोरे (Vasant More) यांनी भव्य रोजगार मेळावा (Employment fair ) घेतला होता. या मेळाव्याचे सर्व नियोजन हे मोरेंचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) यांच्याकडे होते. या कार्यक्रमादरम्यान एका शाळेच्या आवारात रुपेश मोरे यांची चारचाकी गाडी लावण्यात आली होती. याच ठिकाणी गाडीच्या वायपरमध्ये (Viper) ‘सावध राहा रुपेश’ अशी चिट्ठी ठेवण्यात आली आली होती. याबाबत आता भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत.