बीडची पोलिस कॉन्सटेबल झाली मिस महाराष्ट्र

बीडमध्ये महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या आणि शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांना मिस महाराष्ट्रा हा मानाचा किताब मिळाला आहे.कुस्तीपटू आणि पोलिस दल आणि  आता मिस महाराष्ट्र असा प्रवास प्रतिभा यांचा खरंच आश्चर्यकारक आहे. मिस महाराष्ट्र स्पर्धा जिंकल्यामुळे त्या सध्या बऱ्याच चर्चेत आहेत.

बीडच्या पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा या मूळच्या आष्टीच्या आहेत. त्या 2010 साली पोलिस दलात रुजू झाल्या. सध्या त्या पोलिस मुख्यालयात महिला कॉन्सटेबल म्हणून कर्तव्यावर आहेत. प्रतिभा यांना मागील अनेक वर्षांपासून अशा सौंदर्य स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. अखेर त्या यावर्षी सहभागी झाल्या. त्या केवळ पोलिस दलातच नाहीतर त्यांनी याआधी कुस्तीचे मैदान देखील गाजविले आहे.

आता त्यांना मिस युनिव्हर्स बनायचे आहे.प्रतिभा यांचे आयोजा कुस्तीपटू होते. त्यांना अगदी लहानपणी पासून खेळाची आवड होती. त्या आजोबांकडून कुस्ती शिकल्या.त्या शाळेत असताना गॅदरिंगमध्ये देखील सहभागी होत. बीड जिल्हा ऊसतोड करणाऱ्या मंजुरांचा जिल्हा आहे.

प्रतिभा म्हणतात पालकांनी मुलींचा लवकर विवाह न करता त्यांना योग्य शिक्षण देऊन स्वताच्या पायांवर उभे करावे.प्रतिभा महिला शिक्षणासाठी आता जनजागृती देखील करणार आहेत. प्रतिभा यांचे हे यश अनेक महिलांना नवीन आदर्श देणारे आहेत.