बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा हंगाम आता अंतिम चरणात आहे. दहाव्या आठवड्यात अर्थात 6 ऑक्टोबरला या हंगामाचा ग्रँड फिनाले होणार आहे. तत्पूर्वी नवव्या आठवड्यात सर्वात कमी मतं मिळाल्याने पंढरीनाथ कांबळे घराबाहेर पडला आहे. मात्र त्याने जाता जाता अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरात पहिल्या दिवसापासून पॅडीने सूरजला खंबीरपणे साथ दिली. शिक्षण पूर्ण झालं नसल्याने सूरजला लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे अनेकदा टास्क समजून घेण्यात सूरजला अडचण निर्माण व्हायची. अशावेळी पंढरीनाथने पुढाकार घेऊन त्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. एवढंच नव्हे तर घराबाहेर गेल्यावर सुद्धा सूरजची साथ सोडणार नाही असं पॅडीने यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं आहे.
घराबाहेर जाताना प्रत्येक सदस्याला आपल्या खात्यात असणारे म्युचुअल फंड्सचे कॉइन्स अन्य सदस्याला द्यायचे असतात. यावेळी पंढरीनाथने अपेक्षेप्रमाणे ५० कॉइन्स सूरजला दिले. मात्र, हे कॉइन देताना अभिनेता म्हणाला, “मी माझ्या कॉइन्सचा नॉमिनी सूरज चव्हाणला करतोय… तो सगळ्या गोष्टींचा नॉमिनी असेल आणि फक्त इथेच नाहीतर मी त्याचं पालकत्व आता आयुष्यभरासाठी घेतलंय.”
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपचे बहुमताने सरकार येणार, रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास
वडगावशेरीत ‘आप’चा उमेदवार ठरला, प्रशांत केदारी लढवणार विधानसभा निवडणूक
विधानसभेच्या १२ जागांबाबत तडजोड नाही : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष