बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळणार

लंडन – बेन स्टोक्सने (Ben Stokes) वयाच्या ३१ व्या वर्षी एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) जाहीर केली आहे. आता तो मंगळवारी आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वनडे खेळणार आहे. सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर त्याने लिहिले – मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडसाठी एबेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळणारकदिवसीय क्रिकेटमधील माझा शेवटचा सामना खेळणार आहे.

मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी हा अत्यंत कठीण निर्णय होता. माझ्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडकडून (England) खेळताना मी प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटला आहे. हा प्रवास माझ्यासाठी खूप छान होता. तो पुढे म्हणाला की आता या फॉरमॅटमध्ये तो आपल्या संघासाठी 100 टक्के देऊ शकत नाही. आता मला तिन्ही फॉरमॅटमध्ये इतके चांगले क्रिकेट खेळता येणार नाही, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे.

त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2011 मध्ये आयर्लंडविरुद्ध इंग्लंडकडून पदार्पण केले. त्याने इंग्लंडकडून 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 39.45 च्या सरासरीने 2919 धावा केल्या आहेत.