लाभार्थ्यांनी ‘आयुष्मान भारत योजने’चा लाभ घ्या – आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे

गंगाखेड/ विनायक आंधळे : गंगाखेड मतदार संघातील गरजूंना चांगली व मोफत वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांच्या पुढाकाराने शासकीय योजना मोफत मदत केंद्राद्वारे गंगाखेड (Gangakhed) शहरातील संत जनाबाई मंदिरात ‘आयुष्मान भारत योजने’ची (Ayushman Bharat Yojana) नाव नोंदणी व कार्ड वितरण सेवा शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुभाष नळदकर यांनी केले.

सादरील नाव नोंदणी व वितरण सेवा सातत्याने गंगाखेड मतदार संघामध्ये पुढील दोन महिने चालनार आहे. तरी, लाभार्थ्यांनी अधिक माहिती साठी व नाव नोंदणी साठी व इतर योजनांच्या माहिती साठी शासकीय योजना मोफत मदत केंद्र, राम सीता सदन गंगाखेड येथे भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन गंगाखेड मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले. शहरातील शेकडो नागरिकांनी शिबीराला भेट देऊन या योजनेचा लाभ घेतला. यावेळी, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, नगरसेवक राजेश दामा, उद्धव शिंदे, माणिक आळसे, अभिजित चक्के व नागरिक उपस्थित होते.