शिंदे गटातील आमदाराचं सूचक वक्तव्य, उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

मुंबई – शिवसेना आणि शिंदे गटाच्या (Shivsena vs Eknath Shinde) वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सत्तासंघर्षाचे प्रकरण आता 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, जोपर्यंत सुनावणी सुरू आहे, तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगालाही (Election Commission) दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला होता. निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आम्हालाच मिळेल आणि पुन्हा आम्हीच आमदार होऊ असं सांगत भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालेल. याचा निर्णय व्हायला चार ते पाच वर्ष लागतील असे संकेत गोगावले यांनी दिले आहेत.

भरत गोगावले काय म्हणाले आहेत

आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत असं ते म्हणालेत. धनुष्यबाण आमचाच आहे, ७ तारखेला आम्ही तुम्हाला दाखवतो. या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. अपात्र होतील सरकार कोसळेल याची वाट पाह होतो. पण मी आज सांगतो, घटनापीठाकडे गेलेल्या तक्रारीवर चार ते पाच वर्ष निकाल येणार नाही. यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ.