महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांच्या वेदना समजून घ्यायला राज्य सरकारला वेळ नाही पण…, भारती पवारांचा टोला

bharati pawar

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या बंद संदर्भात व्यापाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.

या बंदवरून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांच्या, शेतकर्‍यांच्या वेदना समजून घ्यायला राज्य सरकारला वेळ नाही, पण शेजारच्या राज्यात घटना घडली तर त्याचं राजकारण करून हा बंद पुकारला गेला या बंदचा मी निषेध करते. या बंदला जनता जुमानणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा’, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी ठाकरे सरकारवर केली.

दरम्यान, महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे. या नेत्यांना शेतकर्‍यांप्रति खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=XjmHK3oCVPg&t=3s

Previous Post
kangana -p rajypal

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ, शेतकऱ्यांसाठी नाही – काँग्रेस

Next Post
maharashtra band

सत्ताधारीच बंद कसा पुकारु शकतात ?, महाराष्ट्र बंदविरोधात वकिलाची हायकोर्टात धाव

Related Posts
नीलम गोऱ्हेंकडे मर्सिडीज कुठून आल्या?, सुषमा अंधारेंचा सवाल

नीलम गोऱ्हेंकडे मर्सिडीज कुठून आल्या?, सुषमा अंधारेंचा सवाल

Sushma Andhare | दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “असे घडलो आम्ही” या विशेष कार्यक्रमात शिवसेना…
Read More
Big Breaking : गँगस्टर राजू ठेहटची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

Big Breaking : गँगस्टर राजू ठेहटची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

सीकर – राजस्थानमधील सीकरमध्ये गँगस्टर राजू ठेहट याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चार-सहा हल्लेखोरांनी राजूच्या घराजवळ त्याच्यावर…
Read More
वयाच्या ४० व्या वर्षी सुपरमॅन बनला फाफ डु प्लेसिस, असा घेतला अद्भुत झेल

वयाच्या ४० व्या वर्षी सुपरमॅन बनला फाफ डु प्लेसिस, असा घेतला अद्भुत झेल

Du Plessis catches | सध्या फाफ डू प्लेसिस दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या २०२५ च्या एसए२० लीगमध्ये खेळताना दिसत…
Read More