भारतीय जनता पार्टी राज्यसभेची तिसरी जागा १००% जिंकणारच – चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्यसभेची निवडणूक आता चांगलीच रंगतदार बनली आहे.(rajya-sabha-elections) आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून गेली असून शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी कुणीही माघार घेतलेली नाही. आज सकाळी मविआचे नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर निवडणूक होणारच हे निश्चित झालं आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आता भाजपने देखील आरपारच्या लढाईची तयारी सुरु केली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State President Chandrakant Patil) म्हणाले, मविआच्या नेत्यांसोबत आमची चर्चा झाली. आमच्या प्रस्तावावर अधिकृतपणे त्यांच्याकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता निवडणूक अटळ आहे आणि भारतीय जनता पार्टी तिसरी जागा १००% जिंकणारच आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.