शंभर बापाची औलाद नसशील, तर…,मोहित कंबोज यांच्यावर भास्कर जाधवांचा प्रहार

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला आहे.

कंबोज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला आणि 22 जून रोजी बंडखोर आमदार गटात सामील होण्याची विनंती केली. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवण्यास योग्य नसल्यामुळे त्यांना गटात घेण्यास एकनाथ शिंदेजी नाखूष होते. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकिटही बुक केले. भास्कर जाधव हे सत्य नाकारू शकतात का?

दरम्यान, या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या आरोपानंतर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पलटवार केला आहे. ‘जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा’, अस आव्हान जाधवांनी कंबोज यांना दिलं.

मी मोहित कंबोज ही व्यक्ती कधी समोर बघितलेली नाही. पण, संपूर्ण चॅनेलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान देतोय की, यातील एक तरी आरोप हा मोहित कंबोजसारखा हरामखोर माणूस… तो जर शंभर बापांची पैदास असेल, तर हा आरोप सिद्ध करणार नाही आणि तो जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा, असं आव्हान भास्कर जाधव यांनी दिलं.