पुण्यात कॉंग्रेसला मोठा धक्का; मातब्बर नेता भाजपच्या वाटेवर 

Pune : माजीमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे (Ex-corporator Avinash Bagwe, son of former minister Ramesh Bagwe) हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. काल काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक रशीद शेख (Former Councilor Rashid Shaikh) यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिल्याने अविनाश बागवे नाराज आहेत. त्यांना पक्ष प्रवेश नको होता. तस त्यांनी पक्ष नेतृत्वाला कळवले देखील होते.

रशीद शेख यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नका असा अविनाश बागवे यांचा आग्रह होता. पक्ष नेतृत्वाने बागवे यांना तसा विश्वास देखील दिला होता. मात्र अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी रशीद शेख यांना प्रवेश दिल्याने बागवे नाराज आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर काँग्रेस भवन येथे नेत्यांची रेलचेल असताना देखील बागवे इकडे फिरकले देखील नाहीत. दुसरीकडे यामुळे नाराज झालेले अविनाश बागवे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हे तीन टर्म काँग्रेसचे नगरसेवक आहेत. शेख यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या बागवे पिता-पुत्रांची नाराजी समजतात भाजपकडून अविनाश बागवे यांना तातडीने आज संपर्क करण्यात आला. दरम्यान, आता हे नाराज पिता-पुत्र नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.