काँग्रेसला मोठा धक्का ; मराठवाड्यातील ‘या’ दिग्गज नेत्याने केला समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर निकाळजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

सुधाकर निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सकारात्मक फरक पडेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरी भागात आपला प्रभाव वाढवण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. उल्हासनगर, भिवंडी यासारखी शहरे राष्ट्रवादीमय करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. अशीच जालना जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहोत, असे जयंत पाटील यांनी नवीन सदस्यांना सांगितले.

आपला पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे. या विचारांना धरूनच आपण सर्वांनी एकत्र मिळून जालना जिल्ह्यात अधिक जोमाने काम करुया, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. आगामी निवडणुकीत आपण जालना जिल्ह्यात केलेल्या समाजकार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत राजेश टोपे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी सुधाकर निकाळजे यांच्यासह विजय बनकर, नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते राजू दळे, भिमशक्तीचे रोहिदास गंगातिवारे, संतोष उन्हाळे, कैलास बनसोडे, भिमसेना पँथर पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर अख्तर, भिमशक्तीच्या जिल्हाध्यक्षा विशाखा सिरसाळ, धामगांवचे सरपंच अनिल साळवे, चिनेगाव ग्रामपंचायत सदस्य शिवाजी तायडे, कामगार नेते दिपक दांडगे, आरपीआयचे विजेंद्र दवंडे, उद्योगपती श्याम शिरसाट, बसपाचे शरद पवार, बसपा घनसावंगी विधानसभा सदस्य शेख बशीर शेख शमशोद्यीन, बसपा सेलगावचे ग्रामपंचायत सदस्य निलेश सोनावणे, समाजवादीचे ॲड. शेख वसीम शेख नबी-सिपोराकर, कांतीलाल हिवाळे, बाबासाहेब खरात, निलेश काकडे, कैलास गवई, निलेश डोलारे, रवी गायकवाड, अमोल तुपे, चंद्रकांत सोनावणे, ॲड. विनोद डिगे -जाफ्राबाद, संदिप गाडगे, शिवाजी चौहान, मांडवा ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मोरे, अभिषेक डिगे, बाळकृष्ण हिवाळे, सुनीता गायकवाड, रंजना राजेगावकर, शारदा गवई आदींनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

एक महिला बापूंच्या विरोधात बोलल्याने गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे – मलिक

Next Post
Jayant Patil

भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे – पाटील

Related Posts
mohit kamboj - nawab malik

‘नवाब मलिकांनी अनेक बांगलादेशी तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलले’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.…
Read More
पापविनाश

पापविनाश मंदिर लातूरच्या इतिहासाचे सोनेरी पान …..!!

लातूर शहरात असलेल्या प्राचीन भूतनाथ मंदिरापासून जवळच पापविनाश हे भव्य तीर्थ आहे. या मंदिरात आढळलेला शिलालेख लातूरच्या संपन्न…
Read More

सीताराम कुंटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढणार?

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी लेटर बॉम्ब टाकत 100 कोटींच्या वसुलीबाबत…
Read More