Big Breaking : गँगस्टर राजू ठेहटची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

सीकर – राजस्थानमधील सीकरमध्ये गँगस्टर राजू ठेहट याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चार-सहा हल्लेखोरांनी राजूच्या घराजवळ त्याच्यावर गोळ्या झाडल्या. राजूचे आनंदपाल टोळी आणि बिष्णोई टोळीशी वैर होते. लॉरेन्स बिश्नोईच्या रहित गोदाराने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

आनंदपाल आणि बलबीर यांच्या हत्येचा बदला घेतल्याचे रोहित गोदाराने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. राजूच्या हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकेबंदी केली आहे. राजूला तीन गोळ्या लागल्याचे वृत्त आहे. हरियाणा आणि झुंझुनूच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. गुंड राजू गुन्हेगारी जग सोडून राजकारणात येणार असल्याचे बोलले जात होते.

सीसीटीव्हीच्या आधारे या हत्याकांडातील चार तरुणांचा सहभाग समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये एक तरुणही राजूशी बोलत असल्याचे दिसत आहे. दोघांची ओळख होती असे दिसते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या गोळीबारात एक तरुणही जखमी झाला आहे.