अहमद पटेल यांनी नरेंद्र मोदींविरोधात कट रचला होता; एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात मोठा खुलासा

अहमदाबाद –  गुजरात एसआयटीने सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) तीस्ता सेटलवाड (Teesta Setalwad)यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्रात मोठा खुलासा केला आहे. सेटलवाड, निवृत्त डीजीपी आरबी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट (Sanjeev Bhatt)यांच्यावर २००२ च्या गुजरात दंगलीसंदर्भात खोटे पुरावे आणि कट रचल्याचा आरोप आहे. तिघांनाही गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी, 15 जुलै रोजी तिस्ता सेटलवाडच्या जामीन अर्जाविरोधात दाखल केलेल्या एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात एक मोठा खुलासा झाला आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे तपास अधिकारी बीसी सोलंकी (BC olanki) यांनी शुक्रवारी अहमदाबाद येथील सिटी सिव्हिल आणि सेशन्स कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले. ज्यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे सल्लागार दिवंगत अहमद पटेल (Ahmed Patel)यांच्या सांगण्यावरून हे घडल्याचे म्हटले होते. अहमद पटेल यांच्याकडून यासाठी दोनदा पैसे घेण्यात आल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

तीस्ता सेटलवाड यांच्या जामिनाला विरोध करत एसआयटीने प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की, गुजरात आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न तीस्ताच्या माध्यमातून अधिक राजकीय वक्तव्ये करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा कट रचताना सेटलवाड यांचा उद्देश निवडून आलेले सरकार बरखास्त करणे किंवा अस्थिर करणे हा होता. या प्रतिज्ञापत्रात दावा करण्यात आला आहे की, सेटलवाड यांनी गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह गुजरात राज्यातील अनेक अधिकारी आणि इतर निरपराध व्यक्तींना अडकवण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी राजकीय पक्षाकडून कथितपणे आर्थिक आणि इतर विविध फायदे मिळवले.

काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता. अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून, सेटलवाड यांना २००२ मध्ये गोध्रा नंतरच्या दंगलीनंतर ३० लाख मिळाले. तसचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे या प्रकरणात गोवण्यासाठी दिल्लीत दोघांच्या बैठकीदेखील होत होत्या, असा दावाही एसआयटीने केला आहे.