आरोह वेलणकर अन् राखी सावंतमध्ये कडाक्याच भांडण; अभिनेता म्हणाला, ‘तुझ्या बापाचं…’

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सुरू असून प्रत्येक दिवशी प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात येत्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी “शाई फेक” हे नॉमिनेशन कार्य रंगले आहे. या नॉमिनेशनचा एक प्रोमो कलर्स मराठीने नुकताच प्रदर्शित केला आहे. या प्रोमोत राखी सावंत आणि आरोह वेलणकर यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रोमोत दिसते की, शाई फेक या नॉमिनेशन कार्यासाठी राखी आणि आरोहला उभे केलेले असते. यावेळी आरोह हा राखीवर आरोप करताना दिसत आहे. “राखी प्रत्येक वेळा कुरघोड्या करणं, गळ्यात लिंबू मिरची लटकवणं.. हे चर्चेत राहण्यासाठी करते”, असे आरोह म्हणाला. त्यावर राखी म्हणाली की “मी ह्याच्यासारखी पूर्ण दिवस झोपून तर राहत नाहीये.” यावर ‘तुझ्या बापाचं काय जातं?’ असे आरोह तिला म्हणाला. आरोह राखीला वडिलांवर बोलल्यानंतर ती भयंकर चिडली. ‘तू वडिलांवर जाऊ नकोस’, असे तिने त्याला रागात म्हटलं.

त्यावर आरोहने ‘मी जाणार’ असे तिला ठणकावून सांगितले. यामुळे राखी आणि आरोह यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी राखी भयंकर चिडल्याचे पाहायला मिळत आहे. ती यावेळी आरोहच्या अंगावर धावून जाताना पाहायला मिळत आहे.