Bipasha Basu : लग्नाच्या ६ वर्षांनंतर बिपाशा बासू झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म

Bipasha Basu : बॉलीवूड दिवा बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर आई-वडील झाले आहेत. बिपाशाच्या घरी लहान परीचा जन्म झाला आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बी टाऊनमधील सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. बिपाशा-करणचे 2016 मध्ये लग्न झाले, त्यानंतर 6 वर्षांनंतर 12 नोव्हेंबरला बिपाशा बसू आई झाली. बिपाशा बसूच्या आधी ६ नोव्हेंबरला अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील झाले. आलिया भट्टनेही एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे.

अलीकडेच, बिपाशाने गाऊन घालून बेबी बंप फ्लॉंट करताना फोटोशूट केले होते, ज्यामध्ये बिपाशा बसू खूपच सुंदर दिसत होती. बिपाशा बसू वयाच्या 43 व्या वर्षी आई झाली आहे, बिपाशा गरोदरपणात सोशल मीडियावर खूप सक्रिय होती आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत होती. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची भेट 2015 मध्ये ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यादरम्यान दोघेही एकमेकांचे मित्र झाले आणि लवकरच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर बिपाशा-करणने लग्न केले.

बिपाशा बसूने 1996 मध्ये मॉडेलिंगपासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर ‘अजनबी’ चित्रपट आला, ज्यामध्ये बिपाशा करीना कपूर, अक्षय कुमारसोबत दिसली होती. या चित्रपटासाठी बिपाशा बसूला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. बिपाशा बसूचा दुसरा सर्वात हिट चित्रपट ‘राज’ होता. त्यानंतर बिपाशा यशाची शिडी चढत गेली. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बिपाशा बसूने अभिनेता जॉन इब्राहिमला डेट केले होते. दोघांचे नाते जवळपास 9 वर्षे टिकले आणि चाहत्यांनाही त्यांची जोडी आवडली, पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.