लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं,बिपिन रावत देखील जखमी ?

नवी दिल्ली : तामीळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हेलीकॉप्टरमध्ये बडे लष्कर अधिकारी देखील होते. यामध्ये सीडीएस बिपिन रावत ,त्यांच्या पत्नी, पायलट आणि एक व्यक्ती असे प्रवास करत होते. या अपघातात चार जणांचा मृत्यु झाल्याचं सांगितलं जात आहे.

तामीळनाडूमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड पाऊस पडत आहे, त्यामुळे ही घटना घडली आहे. या हेलीकॉप्टरमध्ये 14 जण प्रवास करत होते. त्यापैकी चौघांचे मृतदेह सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बिपिन रावत हे त्यांच्या पत्नीसह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र कुन्नूरच्या घनदाट अरण्यात ही घटना घडली. जखमीची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

सीडीएस बिपिन रावत
मधूलिका रावत
ब्रिगेडियर एल.एस.लिड्डर
लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
गुरूसेवक सिंग
जितेंद्र कुमार
विवेक कुमार
बी.साई तेजा
सतपाल