मोठी बातमी – बिपिन रावत यांचे निधन

भारताचे सीडीएस बिपित रावत यांचे हेलीकॉफ्टर अपघातात निधन झाले आहे. हवाई दलाने याबाबत माहिती दिली आहे. अपघातग्रस्त हेलीकॉफ्टर मधून 14 जण प्रवास करत होते. या अपघातात चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत. लष्कराचं आयएफएमआय 17v5 हे हेलीकॉफ्टर होते.मिळालेल्या माहितीनुसार बिपिन रावत हे त्यांच्या पत्नीसह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र कुन्नूरच्या घनदाट अरण्यात ही घटना घडली.